देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरा होण्याचा दर ९५ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात २ लाख ४६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ४ कोटीच्या वर गेली आहे. काल १ लाख ४९ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, १ हजार ७२ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात १४ लाख ३५ हजार ५६९ एक्टीव्ह रुग्ण आहेत. देशातला सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर १३ पूर्णांक ३ शतांश टक्के आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.