लसीकरण मोहिमेत १७१ कोटी ४६ लाखापेक्षा जास्त लसमत्रांचे वितरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७१ कोटी ४६ लाखापेक्षा जास्त लसमत्रा देण्यात आल्या असून काल ४६ लाख ४४ हजार कोविड मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. देशाचा कोविड आजारातून बरे होण्याचा दर सध्या ९६ पूर्णांक ९५ शतांश टक्के इतका असून काल १ लाख ६७ हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी ११ लाख ८० हजार ७५१ वर पोहोचली. देशात काल कोरोनाच्या ६७ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १ हजार २४१ रुग्ण दगावले.