मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला उपोषणाला बसणार असल्याची संभाजीराजे छत्रपतींची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी २६ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत सामाजातल्या सर्व क्षेत्रातल्या प्रमुख लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. कायदेशीररीत्या टिकणारं आरक्षण मराठा सामजाला द्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली, परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही, आपण आत्तापर्यंत आक्रमक होतो, मात्र आता मी उद्विग्न झालो असल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी म्हणाले.