येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी 11 वाजेपर्यंत यासाठी नियमित शुल्कासहित ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

दरम्यान कोविड 19 संसर्गाच्या उद्रेकानंतर प्रथमच होणाऱ्या या परीक्षेसाठी मंडळानं विविध उपाययोजनांसह काही सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.