औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. २०१६ ला यासंदर्भातला प्रस्ताव मांडला होता. २०२० ला ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रस्ताव सरकारकडे सादर झाला. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी यासंदर्भातल्या प्रस्तावाला मान्यता देण्याची घोषणा सरकारनं करावी, असं मुनगंटीवार म्हणाले.

या मागणीवरुन विरोधी पक्षांनी सभागृहात घोषणाबाजी केली. अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेत काळा बाजार होत असल्याचा मुद्दा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थित केला. अनेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघात धान्य वितरणात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्याकडे लक्ष वेधलं. यासंदर्भात तक्रार आली तर कारवाई केली जाईल, असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत राज्याकडून दिल्या जाणाऱ्या निधीत कोणतीही कपात केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

Popular posts
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image