मनसुख मांडवीय यांनी जनौषधी दिवसानिमित्त देशवासियांचे केले अभिंनदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रसायनं आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी आजच्या जनौषधी दिवसानिमित्त देशवासियांचे अभिंनदन केलं आहे. प्रधानमंत्री जनौषधी योजना देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची हितचिंतक आहे, असं सांगत मांडवीय म्हणाले की, देशभरातील सामान्य जनतेसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. जनौषधी केंद्रांच्या माध्यमातून देशातील प्रत्येकाला किफायतशीर दारात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं.