आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 27 मार्च ते 18 मे या कालावधीत आयपीएलचे सामने नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडीयमवर खेळविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कामांचं नियोजन करण्यासाठी क्रीडा आणि संबंधित विभागांची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतली. एकंदर 20 सामने इथं होणार असून त्यातले 16 सामने प्रकाश झोतात खेळविले जाणार आहेत.

स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष स्टेडियमध्ये बसून हे सामने पाहता येतील. प्रामुख्याने वाहन तळाची गरज असून किमान 5 हजार गाड्यांच्या पार्कींगचे नियोजन करावं असे निर्देश आयुक्तांनी दिले.