राष्ट्रीय नागरिक नोंदपुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय भारतीय नागरिक नोंद पुस्तिका तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. आसाममधे राष्ट्रीय नागरिक नोंद पुस्तिकेतल्या समाविष्ट आणि वगळलेल्या नावांची पुरवणी यादी ऑगस्ट २०१९ मधे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवरुन प्रसिद्ध केली होती, असं त्यांनी सांगितलं.