पुलवामा जिल्ह्यात एक दहशतवादी ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपोरा भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केलं. अवंतीपोराच्या चार्सू भागात सुरक्षादलांचं संयुक्त पथक मोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल या पथकानं केलेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही.