बालकांच्या आधार नोदणीत पालघर जिल्हा सर्वोत्कृष्ट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ च्या महामारीच्या काळात आधार नोंदणीसाठी प्रकल्पात एकच आधार नोदणी संच उपलब्ध असताना देखील अंगणवाडी सेविकांनी त्यावेळेस ६ हजार ५०० बालकांची आधार नोंदणी करुन राज्यात एक आदर्श निर्माण केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याला जागतिक महिला दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबई इथल्या सह्याद्री अतिथीगृहात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, रुबल अग्रवाल आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.