दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती साधेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 

मुंबई : समाजातील गरीब, उपेक्षित, निराश्रीत व्यक्तीला आपापल्या शक्तीनुसार मदत करण्याची परंपरा वैदिक काळापासून भारत देशात आहे. जे कार्य आपल्या वाट्याला आले आहे, ते सर्वोत्तम प्रकारे करणे ही देखील एक प्रकारे ईशसेवाच आहे. स्वतः सोबत दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या ३१ व्यक्तींना ‘समाजरत्न’ पुरस्कार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती तसेच गौ रक्षा फाउंडेशन तर्फे समाजरत्न पुरस्कार देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सुदाम शेठ, आयोजक डॉ.प्रमोद पाण्डेय, सहआयोजिका शैलजा मलिक व सूत्रसंचालिका नीता बाजपेयी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी जीएसटी सहआयुक्त पियुष शुक्ल यांनी लिहिलेल्या ‘द लॉकडाऊन स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

जगात चागंल्या कार्यासाठी मदत देणाऱ्यांची आजही वानवा नसून घेणारेच कमी आहेत असे सांगताना कोविड समूह संसर्गाच्या विपरीत काळात मोठ्या अधिकाऱ्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी अद्भुत प्रकारचे काम केले, त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात जीवितहानी कमी झाली असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ब्रहाकुमारी गोदावरीबेन, विक्रम प्रताप सिंह, हरीश शेट्टी, संगीता तपश गुहा, संजीव निगम, कपिलदेव पांडेय, भावना रघुनाथ कोडियाल, सुजित महाजन, निशित शहा, मनोज वरुडे, श्रीप्रकाश सिंह, नम्रता पमनानी, अरुण रोडे, डॉ. कमलेश राऊत, डॉ. जनार्दन वानखेडे, महाडिक, जयंत आहेर, थोरात, प्रकाश शिरसाठ, सौम्या पाण्डेय, डॉ. वाघमारे, डॉ. फुरकां शेख, रिना बालमुरूगन साळुंखे, सुलतान पटेल डॉ. दत्तात्रय बेटमोगरेकर, दशरथ अर्जुन कांबळे, अरविंद प्रभू, ज्ञानेश्वर भोसले, अँथनी मस्करेन्हस, डॉ अफझल कासम देवळेकर व सुनील शेट्टी यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.