यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मुक्त विद्यापीठाच्या समन्वयानं घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच हे काम सुरू होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते काल नाशिक तालुक्यात सामनगांवमधे शासकीय तंत्रनिकेतनात बोलत होते.

शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधे उपकेंद्रांची निर्मीती केली जात आहे, त्यानुसार नाशिक इथल्या उपकेंद्राचं काम करण्यासाठी निविदा काढल्या असल्याचं सामंत यांनी सांगितलं.