राज्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आज कोविड १९ च्या २५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत एकूण ७८ लाख ७१ हजार २०२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २० हजार ९२२ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार ७५२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २ हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक ९ शतांश टक्के झालं आहे, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.