जम्मू-कश्मीर चकमकीत ३ दहशतवादी ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधे श्रीनगर शहराच्या नौगाम भागात आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांचं संयुक्त पथक या भागात मोहीम राबवत असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला.

प्रत्युत्तरादाखल या पथकानं केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्या जवळ आढळलेली शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला असून, शोधमोहिम सुरु आहे.