आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी एंकंदर ५ पदकं जिंकली. मंगोलियामधील उलानबतार इथं सुरू असलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत आजपासून भारतीय महिला कुस्तीपटूंच्या फ्रीस्टाईल शैलीतील सामन्यांना सुरुवात होईल.