परोपकार हीच सज्जनांची संपत्ती - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परोपकार हीच सज्जनांची संपत्ती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फिजीतल्या सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी आज प्रधानमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.

परोपकार हि भारत आणि फिजी दोन्ही देशांची परंपरा आहे असं ते म्हणाले. या परंपरेचं पालन केल्यामुळेच भारत कोरोना विरोधात यशस्वी लढा देऊ शकला, असं ते म्हणाले.

वसुधैव कुटुंबकम मानणाऱ्या भारतानं कोरोना काळात फिजीसह १५० होऊन अधिक देशांना लस आणि इतर वैद्यकीय मदत पुरवल्याचं त्यांनी सांगितलं.