भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना तसंच नवीन पिढीला बाबासाहेबांच्या यांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. वक्तृत्व, एकपात्री अभिनय, चित्रकला, निबंध, कविता, काव्यवाचन, पोस्टर निर्मिती, आणि रांगोळी स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत.