मंत्री नवाब मलिक यांची उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्री नवाब मलिक यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईपासून दिलासा मिळावा आणि कोठडीतून सुटका व्हावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर तत्काळ दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयाकडून नकार दिल्यामुळे मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यांनी या याचिकेत तातडीनं सुटकेची मागणी केली आहे.