पुण्यात ग्रामीण डाक विभागाने एक लाख नवीन खाती उघडण्याचा केला विक्रम

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे ग्रामीण डाक विभागाच्या वतीने मे महिन्यात एक लाख नवीन खाती उघडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत बारामती इथल्या मुख्य टपाल कार्यालयात शुक्रवारी एका दिवसात 621 नवीन बचत खाती उघडण्याचा विक्रम केला आहे.

पुणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी आपल्या नजीकच्या डाकघरात जाऊन किमान एक तरी बचत खाते उघडावे, असं आवाहन ग्रामीण डाक विभागाचे अधिक्षक बी.पी.एरंडे यांनी केलं आहे. पुणे क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पुणे,सोलापूर,सातारा, अहमदनगर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो.