एल आय सीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आजपासून खुला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आयुर्विमा मंडळाची  बहुप्रतीक्षित आय पी ओ अर्थात प्रारंभिक समभाग विक्री गुंतवणूकदारांसाठी आजपासून सुरु झाली आहे. येत्या ९ मे  पर्यंत हे आय पी ओ नोंदणीसाठी खुले राहतील. या आय पी ओच्या एका समभागाची किंमत ९०२ ते ९४९ रुपये इतकी असेल.

सरकारनं एल आय सीच्या २२ कोटी १३ लाखाहून अधिक समभागांच्या विक्रीतून २१ हजार कोटी रुपये जमा करण्याचं लक्ष निर्धारित केलं आहे. येत्या १६ तारखेला या समभागांचं वितरण केलं जाईल. १७ तारखेपासून हे समभाग शेअर बाजारात उपलब्ध होतील.