आगामी काळात डिजिटल जनगणना केली जाईल- अमित शहा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं आणि शंभर टक्के अचूकतेनं होईल, असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केला. आसाममधल्या कामरूप जिल्ह्यात जनगणना संचालनालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जन्म आणि मृत्यू नोंदणी पुस्तिका जनगणनेशी जोडली जाणार असून प्रत्येक जन्म आणि मृत्यूबरोबरच जनगणनेची माहितीही अद्ययावत होत जाईल, असं शहा यांनी सांगितलं.