दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये नाशिकचा समावेश करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर मध्ये नाशिकच्या समावेशाचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असून या प्रकल्पासाठी तातडीनं सर्वेक्षण करावं, असे निर्देश आज  राज्य शासनानं राष्ट्रीय औद्योगिक आणि मुंबई औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. राज्य शासनानं २००७ साली औरंगाबाद आणि नाशिक या ठिकाणी पहिल्या टप्प्यात दिल्ली मुंबई कॉरिडोर उभारण्यात येणार असल्याचं घोषित केलं होतं.

प्रस्तावित दिल्ली कॉरिडोरसाठी नाशिक इथं पाण्याची उपलब्धता नसल्यानं पहिल्या टप्प्यातुन नाशिकला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे खासदार गोडसे यांनी अप्पर वैतरणा- कडवा- देवलिंक या नदी जोड़ प्रकल्पाला मान्यता मिळवून घेतली. या नदी जोड प्रकल्पातून दिल्ली- मुंबई कॉरिडोर प्रकल्पासाठी पाणी जलसंपदा विभागाकडून आरक्षित करून घेतलं. कॉरीडॉरमध्ये समावेशासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचा विषय निकालात निघाला आहे. 

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image