लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन होणार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात भारत आणि नेपाळमधील मैत्री आणि जवळीक संपूर्ण मानवतेच्या भल्यासाठी काम करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बुद्धपौर्णमेनिमित्त नेपाळमधल्या लुंबिनी इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भारत आणि नेपाळमधले संबंध बौद्ध तत्वज्ञानाच्या माध्यमातून जागतिक प्रश्न सोडवेल असंही ते म्हणाले. लुंबिनीमधील संग्रहालय हे भारत नेपाळ सहकार्याचं एक उदाहरण असल्याचंही त्यांनी सांगितलं.
भारत आणि नेपाळ यांच्यात आज सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि लुंबिनी बौद्ध विद्यापीठ यांच्यात बौद्ध अध्यापनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करणे, काठमांडू विद्यापीठ आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात संयुक्त विद्यमानं पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि त्रिभुवन विद्यापीठ यांच्या भारतीय अध्ययन केंद्र स्थापित करणे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एसजेवीएन लिमिटेड आणि नेपाळ वीज प्रधिकरण यांच्यातल्या सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देउबा यांच्यात लुंबिनी इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला नेपाळ दौरा आटपून कुशीनगर इथं पोहोचले आहेत. इथं त्यांनी महापरिनिर्वाण मंदिरात प्रार्थना केली आणि चिवार दन हा विधी केला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.