प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला संबोधित केलं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केलं. राज्य सरकारच्या ४ महत्त्वपूर्ण योजनांना १०० टक्के यश लाभल्याचं औचित्य साधून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरकार लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचू शकतं याचा दाखला या समारंभानं दिला आहे, असं ते म्हणाले.

२०१४ साली सत्तेत आलो तेव्हा देशातली अर्धी जनता वीज, शौचालयं, लसीकरण, बँक खातं यापासून वंचित होती. मात्र आता सर्वांच्या सहकार्यानं अनेक योजना १०० टक्के यशस्वीतेकडे वाटचाल करत आहेत. हे सबका साथ सबका विकासचं द्योतक आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. गरिबांसाठी तयार केलेल्या कल्याणकारी योजनेपासून कोणीही वंचित राहता काम नये, असं त्यांनी सांगितलं. विविध योजनांमधल्या महिला लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.