राज्यशासन मराठी भाषा संवर्धन आणि मराठी राजभाषा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा संवर्धन आणि मराठी राजभाषा धोरणाची काटेकोर अंमलबजावणी राज्य शासन करणार आहे. सर्वच क्षेत्रातली दुकानं आणि आस्थापनावरच्या पाट्या या ठळक मराठी अक्षरात आणि अर्ध्या भागात असाव्यात. पुढील एक महिनाभरात याची अंमलबजावणी झाली नाही तर  त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.