यंदाच्या पुलित्झर पुरस्कारात ४ भारतीयांचा समावेश

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्रकारिता, लेखन, नाटक अशा क्षेत्रातील कार्यासाठी दिला जाणाऱ्या यंदाच्या पुलित्झर पुरस्काराची घोषणा काल करण्यात आली. जागतिक पातळीवर मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार यंदा ४ भारतीयांना मिळाला आहे. पुरस्कार विजेत्या भारतीय मान्यवरांमध्ये अदनान अबिदी, सना इरशाद मट्टू आणि अमित दवे अशा भारतीय पत्रकारांचा समावेश आहे. तर दिवंगत पत्रकार दानिश सिद्दीकी यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे.