भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.
शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना दि १४ मे २०२२ रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मे ए आर एम ट्रेडर्स ३८, तळमजला, रामगड हटमेंट, शिवडी मुंबई १५ या ठिकाणची तपासणी केली. चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचा आढळला तसेच खाद्यरंग आढळून आला. हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेवून उर्वरित ४२९ किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत ८५ हजार २४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत .
संबंधित हजर व्यक्ती , पेढीमालक यांचे विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे. ही कारवाई म.ना.चौधरी, सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई व एस.एस.जाधव, सहायक आयुक्त (अन्न), परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली ल.सो.सावळे, अन्न सुरक्षा अधिकारी, र.ज.जेकटे, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.