कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज नवी दिल्ली इथं पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पायाभूत कृषी सुविधा निधी योजनेची सुरुवात करण्यात आली होती.

कृषी पायाभूत सुविधा निधीच्या एकात्मिक पोर्टलवर आतापर्यंत सुमारे २३ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत तर एकूण १३ हजार ७०० अर्जदारांना याआधीच दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आलं असल्याची माहिती आकाशवाणीच्या वार्ताहारानं दिली आहे.