शिवसेनेच्या दोन गटातल्या वादासंदर्भातील पुढची सुनावणी येत्या सोमवारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेतल्या दोन गटांच्या वादावरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात अद्याप सुरू आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश आज न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिला.

हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या पीठाकडे सोपवण्यासंदर्भात न्यायालय येत्या सोमवारपर्यंत निर्णय घेईल, असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठाकरे गट, शिंदे गट आणि राज्यपाल या तिन्ही पक्षांच्या वकीलांनी लेखी युक्तिवाद दाखल केले असून पुढची सुनावणी येत्या सोमवारी ८ ऑगस्टला होणार आहे.