एम व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनाने नवीन उंची गाठली - नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनाने नवीन उंची गाठल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नायडू यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत असून त्यांचं अभिनंदन करताना प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की सदनाच्या कामकाजात ७० टक्के वृद्धी झाली असून १७७ विधेयकांवर चर्चा करुन त्यांना मंजुरी देण्यात आली.

तरुण वर्ग, समाज, राष्ट्र त्यांच्या अनुभवाचा लाभ घेऊ शकतात. त्यांचा कार्यकाळ जरी पूर्ण झाला असला तरी राष्ट्रीय आणि सार्वजनिक जीवनात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा अनुभव नेहमीच मार्गदर्शक ठरतो, असं प्रधानमंत्री म्हणाले.