संजय राऊत यांच्या कोठडीत येत्या २२ ऑगस्ट पर्यंत वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयानं येत्या २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तक्रारीवरून राऊत यांना न्यायालयानं ८ ऑगस्ट पर्यंत ईडीच्या ताब्यात दिलं होतं. या काळात ईडीनं संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील पत्रा चाळ प्रकरणी चौकशी केली. राऊत यांची कोठडी वाढवावी अशी ईडीनं मागणी केली होती. त्यावर न्यायालयानं आज हा निर्णय दिला.