इस्रो येत्या रविवारी अंतराळात तिरंगा फडकावणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारताचा गौरव असणारा तिरंगा ध्वज अंतराळात फडकवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो येत्या रविवारी ७ ऑगस्टला एक व्यावसायिक प्रक्षेपण यान अंतराळात सोडणार आहे. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी अशाप्रकारे अंतराळात तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती.

अंतराळातल्या छोट्या व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात यामुळे भारतच महत्त्व जगात वाढणार असून त्या दृष्टीनं हे उपग्रह  प्रक्षेपण  मैलाचा दगड ठरणार आहे, असं इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितल. या लघुग्रह प्रक्षेपणा बरोबरच भारतातल्या ७५ ग्रामीण विद्यालयातील  ७५०  विद्यर्थिनींनी तयार केलेल्या, आजादी सॅट हा छोटा उपग्रह ही अंतराळात सोडला जाणार आहे.  

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतातील युवतींमध्ये विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञान यांची आवड वाढावी, या उद्देशानं इस्त्रोच्या सहकार्याने  हा विशेष प्रकल्प राबवण्यात आला होता.