कोविडमध्ये अनाथ झालेल्या मुलांच्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा भार राज्यसरकार उचलणार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड महामारीत आईवडील दोन्ही गमावलेल्या मुलांपैकी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची फी राज्यसरकार भरेल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्यविधानसभेत आज ते प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.
मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्युमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना सांगितलं.
मेटे यांच्या अपघाताच्या वेळी मदत पथकाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे ते वेळेवर पोहोचू शकलं नाही. यापुढं अपघाताच्या नेमक्या स्थळाची माहिती ताबडतोब संबंधित पोलीस ठाण्याला मिळावी, याकरता विशेष यंत्रणा विकसित करण्यात येईल, असं ते म्हणाले.
मेटे यांचा वाहनचालक सतत जबानी बदलत असून, त्यामुळे ही गुंतागुंतीची चौकशी अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडे सोपवण्यात आली आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश पोलिसांना मिळाल्याप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर सरकारनं तपशीलवार निवेदन सादर करावं असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.