भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं.

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सध्या जगभरातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. जगातल्या इतर मोठ्या अर्थव्यवस्था मंदीचा सामना करत आहेत, असंही ते म्हणाले.

गेल्या काही काळातल्या बाजारपेठेतल्या उलाढालींवरही त्यांनी भाष्य केलं आणि जागतिक आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करता याचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँक करत असलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.