महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन

 

पुणे : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतीक मंत्रालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यातून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, शासकीय विभागीय ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीचे उद्घाटन उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्या हस्ते झाले. रॅलीला सारस बाग येथून प्रारंभ झाला. रॅली पुरम चौक मार्गे बाजीराव रोड, नातुबाग चौक, शनिपार चौक, आप्पा बळवंत चौक मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी लेखिका माधवी कुंटे, सहाय्यक ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले उपस्थित होते.

प्रास्ताविक श्री.रिद्दीवाडे यांनी केले. रॅलीमध्ये सेंट हिल्डाज मुलींची शाळा, जिजामाता मुलींची शाळा, नूतन मुलींची शाळा, ठाकरसी कन्या प्रशाला, सुंदराबाई राठी मुलींच्या शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image