’मिशन वात्सल्य’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या कार्यशाळेचे उद्घाटन

 

पुणे : मिशन वात्सल्यअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ तसेच ‘कारा’ दत्तक नियमावली २०२२ या विषयावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले.

हॉटेल अरोरा टॉवर्स येथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व जिल्हा संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) व विशेष दत्तक संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासाठी आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन संस्थेच्या (कारा) संचालक डॉ. जगन्नाथ पती, बालविकास उपायुक्त राहुल मोरे, बाल संरक्षण कार्यक्रम व्यवस्थापक मनिषा बिरारीस, कारा संस्थेचे प्रतिनिधी श्रीमती इंदू वर्माती, महाराष्ट्र राज्य दत्तक स्त्रोत संस्थेचे (सारा) कार्यक्रम अधिकारी छाया म्हंकाळे, विजय विभाड आदी उपस्थित होते.

श्रीमती विमला म्हणाल्या, कार्यशाळेत बाल न्याय व्यवस्थेतील कायदे, दत्तक नियमामधील झालेला बदल, बाल न्याय कायद्याच्या अनुषंगाने कार्यशाळेत सहभागी घटकांची भूमिका आणि जबाबदाऱ्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कायदा व नियमांचे सर्वांगीण ज्ञान आत्मसात करावे. बाल न्याय, संरक्षण तसेच दत्तकप्रक्रियाबाबत अधिकाऱ्यांना चांगल्याप्रकारे करण्याची संधी आहे. याबाबत आपल्यास्तरावर येणाऱ्या शंकाचे निरसन काराच्या प्रतिनिधींकडून करुन घ्यावे, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

दत्तक प्रक्रियेत होत असलेला विलंब टाळण्यासाठी ही प्रक्रिया न्यायालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया राबविताना प्रत्येक भागधारकाची जबाबदारी व त्यांच्या भूमिकेत झालेला बदल याबाबत या कार्यशाळेत सविस्तरपणे मागदर्शन करण्यात येणार असून याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

Popular posts
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image