प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांना आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येत्या बुधवारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता असून त्यानंतर ते ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी इथं पक्षाच्या शिबिरात सहभागी होतील, आणि  ८ नोव्हेम्बर रोजी नांदेड इथं काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत ते सहभागी होतील, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.