कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य सुदृढ आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता -प्रल्हाद जोशी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्यासाठी वर्तमानात खनन कार्य अधिक सुदृढ होण्याची आणि नवीन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय कोळसा आणि खान तसेच संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. काल नागपूरात जोशी यांनी वेस्ट्रेन कोलफील्ड लिमिटेड(WCL) (वेकोली) च्या कामाचा आढावा घेतला.

प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते वेकोली पेंच क्षेत्रातील बाळ गंगाधर टिळक इको पार्कचे ऑनलाइन उदघाटन करण्यात आले. कोळसा क्षेत्रातील वर्तमानाची स्थिती आणि भविष्यात केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल त्यांनी यावेळेला सविस्तर चर्चा केली. बैठकीला वेकोलीचे सहप्रबंध संचालक मनोज कुमार, कोळसा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव व्ही. के. तिवारी यासह वेकोलीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.