पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित मुद्यांवर भारताचा आक्षेप
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित अनेक संदर्भांवर भारतानं आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत असा पुनरुच्चार भारतानं यावेळी केला. भारत सातत्यानं चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर संदर्भात चिंता आणि निषेध व्यक्त करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.