मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान मंदिरांच्या जमिनी बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणी नियुक्त विशेष तपास पथकानं आपला अहवाल दिल्यानंतरही काहीही कारवाई झाली नसल्यानं, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती, खंडपीठानं धस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते, त्याला धस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यानं, धस आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह सात जणांविरोधात, आठ मंदिरांची जमीन ताब्यात घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.