खाजगी दूध उद्योग संघांच्या दुध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची घट

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या खासगी दूध उद्योग संघांनी दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयानं कमी केला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या दूध भुकटीच्या दरामुळे ही कपात करण्यात आली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र राज्यातल्या संघटीत दूध उद्योगांच्या नफेखोरीमुळे दर कपात झाली असल्याचं तज्ज्ञांचं मत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य शासनानं दूध भुकटीला वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला, मात्र एक वर्षानंतर अनुदान मिळत नसल्याचं कारण देत खासगी संस्थांनी या योजनेतून माघार घेतली होती.