६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचं १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाशी दीर्घकाळ संबंधित असलेले मात्र नजीकच्या काळात दिवंगत झालेल्या कलाकारांचे कुटुंबीय आणि शिष्यांना महोत्सवात सहभागी करून घेत, मंडळ त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहणार आहे.

या महोत्सवात कला सादर करणाऱ्या कलाकारांची यादी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी काल झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली.