करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं सरकारी कार्यालयांचं कामकाज चाललं पाहिजे-अनुराग ठाकूर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कार्यालयं ही लोकांच्या करातल्या पैशांवर चालतात. त्यामुळे करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं कामकाज चाललं पाहिजे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं. त्यांनी आज मुंबई इथल्या आकाशवाणी कार्यालयाला भेट दिली त्यानंतर ते बोलत होते. या दरम्यान त्यांनी आकाशवाणीच्या वृत्त विभागाला भेट दिली आणि कामाचा आढावा घेतला. अनुराग ठाकूर सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते आकाशवाणी, फिल्म्स डिव्हिजन, पत्रसुचना कार्यालय, दूरदर्शन आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या कार्यालयांना भेट देऊन स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढाव घेणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज सकाळी आकाशवाणीला भेट दिली.