उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी समितीची स्थापना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 मध्ये प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय मान्यता परिषदेसाठी धोरण तयार करण्याची जबाबदारी असणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था परिषदेचे अध्यक्ष तसंच कानपुर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था प्रशासक मंडळाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर के. राधाकृष्णन हे समितीच्या अध्यक्षस्थानी असतील असं शिक्षण मंत्रालयानं म्हंटलं आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी आणि वैविध्यपूर्ण शिक्षण प्रणाली आहे. आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची अधिमान्यता महत्त्वपूर्ण ठरते.