मुंबईसह महाराष्ट्रात गोवर संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावात वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यापासून गोवर या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या कालावधीत ३ हजाराहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांपासून तरुणांनाही गोवर झाल्याचं समोर आलं आहे. गोवरमुळे १० मुलांचा मृत्यु झाला आहे.

लहान मुलांसह ८० वर्षावरील वयोवृद्धांनाही गोवरचा धोका आहे. या वयोगटातल्या नागरिकांना गोवरची लागण होऊ नये, म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. तरुणांना गोवरचा धोका त्या प्रमाणात नसल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.