राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार असल्याचं, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुंबईबरोबरच राज्यातल्या इतर भागात संशयित गोवर रुग्णांबाबत सतत माहिती घेतली जावी, सर्व महापालिकांमध्ये गोवर प्रतिबंधात्मक विशेष कक्ष कार्यान्वित करावेत, आणि लसीकरणाच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या असल्याचं सावंत यांनी सांगितलं.