भारतीय रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा प्रारंभ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज किरकोळ व्यवहारांसाठी डिजिटल चलन सुरु केलं. पथदर्शी तत्वावर प्राथमिक टप्यात आठ बँकांचा समावेश केला आहे. डिजिटल रुपयाचं  स्वरूप डिजिटल टोकनच्या स्वरुपात असून, त्याचं मूल्य नोटा किंवा नाण्यांच्या मूल्याइतकचं असणार आहे. सुरुवातीला पहिल्या टप्यात मुंबई, नवी दिल्ली, बेंगळुरू आणि भुवनेश्वरसह चार शहरांमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया, आय.सी.आय.सी.आय बँक, येस बँक आणि आय.डी.एफ.सी फर्स्ट या चार बँकांच्या माध्यमातून हे चलन सुरू झालं आहे. नंतर ही सेवा अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमला या शहरांमध्ये सुरु होईल. बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या चार बँका यात नंतर सहभागी होतील.