विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन शुक्रवारपर्यंतच सुरू राहणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर इथं सुरु असलेलं राज्य विधीमंडळाचं अधिवेशन येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. उद्या २९ डिसेंबर रोजी शासकीय कामकाज आणि शुक्रवारी ३० डिसेंबरला रोजी शासकीय आणि अशासकीय कामकाज केलं जाईल, असंही  पाटील यांनी सभागृहात सांगितलं.