जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी भारतीय सैन्य प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये जनरल ड्युटी, तांत्रिक, लिपिक,स्टोअरकीपर  आणि  ट्रेड्समन अशा पदांसाठी सुमारे 200 उमेदवारांची शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या, लेखी परीक्षा आणि दस्तऐवज पडताळणी झाल्यानंतर  सैन्य  प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. 1 जानेवारीपासून हे सहा महिन्यांचं प्रशिक्षण सुरू होईल.