सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल - उदय सामंत

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल आणि तोपर्यंत पाण्यापासून वंचित असलेल्या ४२ गावांना पाणी देण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याचा दौरा करून पाण्यापासून वंचित असलेल्या गावांमधल्या दुष्काळग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्रावर आपलं प्रेम आहे, आम्हाला पाणी द्या, आम्ही कर्नाटकात जाणार नाही असं पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यावेळी म्हणाले.